लॉकडाऊनपुर्वी बाकीच्या देशांनी जनतेला पॅकेज जाहीर केलय, तुम्हीही करा – फडणवीस

मुंबई: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. काल राज्यात तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली.  त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी लगेच लॉकडाऊन होणार नाही असे सांगीतले. मात्र  त्यांनी लॉकडाऊनची शक्यता नाकारलीही नाही. इतर देशांनीही लॉकडाऊन केला आहे, असे त्यांनी सांगीतले होते.

यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना झापले होते. लॉकडाऊन करायचं का? यात राजकारण आणू नका. राजकीय पक्षाला विनंती आहे, लोकांची जीव जाईल असं वागू नका. कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचं राजकारण करू नका, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला होता.

परंतू तरीही लॉकडाऊनच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस आक्रमक झाले आहेत. यावर फडनवीसांनी इतर देशांनी लॉकडाऊनपुर्वी जनतेला दिलेल्या पॅकेजची आठवन मुख्यमंत्र्यांना करून दिली. इतर देशांप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेलाही पॅकेज जाहीर करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

फ्रान्सने तिसऱ्यांदा लॉकडाऊन लावला पण १२० अब्ज डॉलरचे पॅकेज जनतेसाठी जाहीर केले. हंगेरीने युरोपीयन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी मिळवला. डेन्मार्कनेही एप्रील २०२० मध्ये सर्वच घटकांना पॅकेज जाहीर केले आहे. ग्रीसमध्येही नागरीकांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

अशाप्रकारे त्यांनी वेगवेगळ्या देशांतील उदाहरणे दिली आहेत. तुलना फक्त परीस्थीतीशी करू नका तर तेथील सरकारने केलेल्या कृतीशीही करा असा सल्ला त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री
लॉकडाऊन करायचं का? यात राजकारण आणू नका. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊन टाळू शकतो, पण परिस्थिती बदलत चालली आहे. वर्क फ्रॉम होम बंधनकारक, आवश्यक गोष्टींनाच परवानगी त्या ठिकाणी दिलीय.

टेस्टींग वाढवत आहेत, बोलणारे बोलतात लसीकरण वाढवले पाहिजे असं केलं पाहिजे. लसीकरणात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे. 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे. मी टिका करत नाही पण केंद्रानं आणखी लस पुरवली पाहिजे,  अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या
फक्त सल्ले देण्याचे उद्योग करू नका, रोज ५० डॉक्टर्स पण द्या; आनंद महींद्रांवर भडकले मुख्यमंत्री
मोठी बातमी! पुण्यात मिनी लॉकडाउन; बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह पीएमपीएल बससेवा सात दिवसांसाठी बंद राहणार
देवेंद्र फडणवीसांना जशाच तसे उत्तर द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.