Share

देवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग करतानाचे फोटो व्हायरल; नेमकं काय आहे प्रकरण?

राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आले होते. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकांसाठी भाजपने विशेष रणनिती आखली होती.(Devendra Fadnavis modeling photo goes viral; What exactly is the case?)

यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव खूप चर्चेत आले आहे. पण आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे व्हायरल होत असलेले हे फोटो मॉडेलिंगच्या काळातील आहेत. २००६ साली देवेंद्र फडणवीस मॉडेलिंग करत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील एका कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केले होते. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत.

https://twitter.com/boogabooga234/status/1541352530084388864?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1541352530084388864%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fdevendra-fadnavis-modeling-photos-goes-viral-on-social-media-ndj97

त्यावेळी हे फोटो नागपूर शहरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या होर्डिंगवर लावण्यात आले होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “देवेंद्र फडणवीस यांचे टॅलेंट बघून छान वाटले.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हे खरचं आहे का?”

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमागे भाजप असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत.

यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी फार महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती मिळत आहे. कारण कनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आणि अपक्ष आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस खूप ऍक्टिव्ह झाले होते. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांशी भेटीगाठी देखील वाढल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :-
बराच काळ डॅनीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली ‘ही’ अभिनेत्री, आता लोकांच्या नजरेपासून दूर करते ‘हे’ काम
10 जूनला जेलमधून सुटला, 15 जूनला पोलिसांकडे गेला, त्यानंतर., वाचा कन्हैयालालच्या हत्येची स्टोरी
‘फूल और कांटे’मधून हिट झालेला अजय देवगण आहे ‘एवढ्या’ कोटींचा मालक, प्रायवेट जेटमधून करतो प्रवास

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now