‘महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यास कमी पडलो’, देवेंद्र फडणवीस झाले चीतपट

मुंबई | विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा पुणे आणि नागपुर मतदार संघात भाजपच्या गडाला सुरुंग लागला आहे. एकट्या भाजपा विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांच्या निकालावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ‘महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यात चूक झाली,’ असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असून आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती. मात्र एकच जागा मिळाली आहे. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.’

‘आमच्या स्ट्रॅटेजीत काही चूक झाली असेल. याव्यतिरिक्त तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला टोला हाणला आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसं आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसे ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुणे पदवीधरची निवडणूक हरल्यानंतर रूपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हणाल्या..
‘आईचा अपमान सहन करणार नाही, जाहीर माफी माग’, कंगनाला भाजपने सुनावले
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..
मराठवाड्यानेही भाजपला डावललं; सतीश चव्हाणांची तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.