‘ठाकरे सरकारला देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का?’

मुंबई | शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास ७० दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. मास्टरब्लास्ट भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने ट्टिटमधून दिले होते. तसेच यानंतर इतरही काही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.

त्यानंतर, ट्विटरवर सचिनला मोठ्या ट्रोल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

फेसबुक पोस्ट करत फडणवीस म्हणतात, ‘राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने ३ फेब्रुवारीला देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वता याबद्दल ट्विट केले होत. ते १ लाख ८ हजार जणांनी रिट्विट केले असून ६७ हजार लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या. सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर जणू सचिनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ
देशात ‘टिकैत फॉर्मूला’ लागू करा; शेतकरी नेत्याच्या ‘या’ मागणीने मोदी सरकारला फुटला घाम..
“त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?”; अजित पवारांचा सेलिब्रिटींना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.