मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. भारत बंदला दिलेल्या समर्थनावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधाला विरोध म्हणून भारत बंदला समर्थ दिले जात आहे. हे सर्व पक्ष दुटप्पी भूमिका घेत आहेत.
ज्या कायद्या संदर्भात आंदोलन चालू आहे ते कायदे सर्वात पहिल्यांदा करणारे राज्य महाराष्ट्र आहे. तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होत. कुठल्याही शेतकर्याची जमीन गेली नाही. याउलट कंपन्यांनी गुंतवणूक करून शेतमालाची थेट खरेदी ठिकठिकाणी केली आहे. असेही ते पत्रकार परीषदेत म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी जाणीवपूर्वक २०१९ काँग्रेसचा जाहीरनामा वाचून दाखवला. यात बाजार समितीचा कायदा निरस्त करण्यात येईल. तसेच शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल अस नमुद केले होते. तसेच शरद पवार यांनी सातत्याने बाजाराच्या सुधारणेचे समर्थन केले आहे.
जेव्हा शरद पवार हे २०१० मध्ये केंद्रात मंत्री होते तेव्हा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठवले होते. त्यांनी कृषी कायद्यांसाठी शिफारस केली होती. त्याबरोबरच शेतकरी आणि शेतीमाल यासंदर्भातील शरद पवार यांच्या आत्मचरित्रात असलेल्या पुस्तकातील उतारा फडणवीसांनी वाचून दाखवला.
काही लोकांना अस वाटत की, या सर्व परिस्थितीवर तोडगा निघू नये. राज्यात केलेल्या गोष्टी केंद्रात केल्या तर काही पक्ष ट्रॅक्टर चालवत आहेत. या कायद्यांना विरोध करून आपल्या दुटप्पी कारभाराचे घडवणारे आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की, शेतकर्यांपर्यत सत्य गोष्टी पोहोचतील व ते याच समर्थन करतील. असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.