‘युती केली नसती तर विधानसभा निवडणुकीत १५०च्या पुढे गेलो असतो’

मुंबई : ‘गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक शिवसेनेसोबत युती केली हेच चुकलं, नाहीतर भारतीय जनता पक्षाने १५० पेक्षाही जास्त जागा जिंकल्या असत्या,’ असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीत होते.

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे यामध्ये प्रमुख वक्ते होते. त्यांनी केलेल्या राजकीय भाकितांचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली,’ असल्याचं फडणवीस म्हणाले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतल्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत भ्रष्टाचाराचे अड्डे उदध्वस्त केले. प्रशासकीय यंत्रणेत बाहेरच्या तज्ज्ञांना सामावून घेत प्रशासनाला नवी दिशा दिली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादाला कर्तुत्वाची जोड दिली. भारताचे नेतृत्व खंबीर असल्याचे जगाला दाखवून दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच ‘भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना २७२ जागा मिळतील, २०१९ मध्ये ३०० पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असे भाकित भाऊ तोरसेकरांनी व्यक्त केले होते. ते खरं ठरलं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, ‘शेतमालाला चांगला भाव, शेतमालाची खरेदी, गरीबांसाठी योजना, लॉकडाउनच्या काळात आत्मनिर्भर अभियानाद्वारे सामान्य जनतेला मदतीचा हात यांसारख्या अनेक गोष्टी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात राबवण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नवं वळण! दिशा सॅलियनच्या मृत्यूचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी? ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य
या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.