मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर टिका केली.
त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही, असे फडणवीसांनी म्हटंले आहे. ‘हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री राज्याने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही, असे त्यांनी म्हटंले आहे.
ते याबाबत मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते. नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्य वर्षपूर्तीला करायची? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. काल न्यायालयाचे आलेले दोन निर्णय यात त्यांची कारकीर्द दिसून येते. अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही. पण सरकारविरोधी विचार मांडल्यावर ते चिरडून टाकू याच्याशी आम्ही सहमत नाहीत, असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तर मुंबई हायकोर्टानेही कंगनाविरोधातील कारवाई अप्रमाणिक आणि अशुद्ध हेतूने केल्याचा मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणारी नाही असं कोर्टाने झापलं, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
“महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले”
एक रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग, जाणून घ्या कसे बनले अविनाश भोसले करोडोंच्या कंपनीचे मालक
सावधान! अनेक कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ‘ही’ भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका