मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये-फडणवीस; का आला फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचा राग?

मुंबई | राज्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी निघाले आहे.

नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत असताना सतत विरोधकांकडून टिका होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. फडणवीस नेहमीच बिहारला जात असतात, त्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जावे. दिल्लीत गेलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी घराबाहेर पडतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या टिकेवर आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले आहे.

इतक्या दिवसांपासून आज दोन-तीन तासांसाठी घराबाहेर आले आहात, तर लगेचच स्वता:ची तुलना मोदी साहेबांशी करु नका. असा टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस माढा आणि करमाळा या भागात गेले होते. तिथे नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

बापाची प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या सनी देओलने तिथे मात्र बापाचा सल्ला धुडकवला; पण शेवटी..

हेमा मालिनी आजपर्यंत एकदाही नवरा धर्मेंद्रच्या घरी गेल्या नाहीत; कारण ऐकून बसेल धक्का

तुरूंगातून बाहेर पडताच रिया बदला घेणार; शेजारीन डिंपल पाठोपाठ पुढचा नंबर अंकीताचा?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.