मुख्यमंञी उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ दाखवत फडणवीसांनी करून दिली ‘त्या’ मागणीची आठवण

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकुळ सुरूच आहे. तसेच विरोधक आणि सत्ताधारी नेतेमंडळी पाहणी दौरे करत आहे. याच पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप – शिवसेना हे सत्तेत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात देखील राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकुळ घातला होता. त्यावेळी फडणवीस सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती. माञ या मदतीवर उध्दव ठाकरे यांनी जोरदार टिका केली होती. ‘सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नसल्याचे त्यांनी म्हंटले होते.

तसेच पुढे या व्हिडीओ मध्ये उध्दव ठाकरेंनी म्हंटले की, ‘सरकारने निषकाच्या फुटपट्ट्या बाजूला ठेऊन २५ हजार रुपयांची तातडीने जाहीर करावी. तसेच हेक्टरमागे २५ ते ५० हजार नुकसान झाले असल्याचे उध्दव ठाकरे यांनी म्हंटले होते.

याचाच धागा पकडत उस्मानाबादमध्ये आयोजित पञकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘उध्दव ठाकरे यांच्याकडे आपला मागणी पूर्ण करण्याची ही उत्तम संधी असल्याचे म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणला आहे.

दरम्यान, मुख्यमंञ्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काही दिलासा मिळालेला दिसत नसल्याचे फडणवीसांनी सांगितले. ‘मी याआधी कधीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली नाही. दौरा करा, करु नका पण भरघोस मदत करा,’ अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘केंद्राने आमची थकीत देणी दिली तर मदतीसाठी हात पसरण्याची गरज नाही’
मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? अखेर शरद पवारांनीच सांगितले कारण
टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.