“आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट”

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जोरात पाठपुरावा सुरू आहे. यासाठी मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. काल मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील बैठक घेतली. तर “तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असे नितेश राणे यांनी दावा केला आहे.

“इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबल्याने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मात्र, मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असे नितेश राणे म्हणाले.

तसेच, “हे चोरांचं सरकार आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाला त्रास द्यायचा आहे. असे म्हणत प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट” असे ते म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, असा आरोपही ठाकरे सरकारवर केला.

महानायक अमिताभ बच्चनची सुन ऐश्वर्याची प्रॉपर्टी ऐकून तुम्ही थक्क व्हाल; आहे करोडोची मालकीण

जाणून घ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत महालक्ष्मीची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.