आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना भवनावर हल्ला करण्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला होता.

प्रसाद लाड यांच्या दिलगिरी व्यक्त करण्याशिवाय भाजपकडून कोणतीही अधिकृत भुमिका मांडण्यात आलेली नाही. असे असतानाच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही. तसंच आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि आलं तर सोडत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता, तेव्हा त्यांना प्रसाद लाड यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले होते. त्याबद्दल बोलताना, प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटले आहे, त्याबद्दल त्यांनी व्हिडिओद्वारे खुलासाही केला होता. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रसाद लाड यांच्या विधानाने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी प्रसाद लाड यांना इशारा दिला आहे.

जेवढ्या थापडा खाल्ल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहे. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा लढवय्या गुण आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा
प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संजय राऊंतानी काढली 3 शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत
आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.