“हायकोर्टाने स्वतः दखल घेऊन अर्णब गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी”

 

दिल्ली | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राजकिय चर्चांना उधाण आले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी याबाबत भाष्य केले आहे.

फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करावी. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे.

या सगळ्या प्रकरणाची न्यायालयाने दखल घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एकीकडे उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनवाईमध्ये अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना आता सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करावा लागणार आहे. सत्र न्यायालयातून जामीन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागणार आहे.

दरम्यान, फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच नाही याआधी बऱ्याच भाजप नेत्यांनी अर्णब यांना जामीन देण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

नंतर राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून या प्रकरणाबत चर्चाही केली आहे. त्यांनी अर्णब यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिलं जावं असे सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.