अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांना पकडल्याने फडणवीस आक्रमक; दिला ‘हा’ इशारा

त्रिपूरात झालेल्या घटनेचे पडसाद अमरावती, नांदेडमध्ये बघायला मिळाले होते. शहरात अनेक ठिकाणी हिंसाचार पहायला मिळाला होता. या घटनांमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्येही जुंपली आहे. भाजप नेते सतत ठाकरे सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

अमरावती शहरात झालेल्या १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवायांमध्ये फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांवर दोषी धरुन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. अमरावती दौऱ्यावर असताना फडणवीसांनी हे वक्तव्य केले आहे.

अमरावतीतील पोलिस राजकीय दबावाखाली एकतर्फी कारवाई करत आहे. पण त्यांचे धोरण असेच राहिले तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. अमरावती पोलिस प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून आम्ही जेलभरो आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, सात दिवसांच्या संचारबंदीनंतर अमरावती शहरात तणावपुर्व शांतता दिसून आली आहे. अत्यावश्यक कामांकरिता प्रशासनाने दिलेल्या वेळेत नागरिकांना बाहेर पडण्यासाठी तसेच दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली जात आहे.

१२ नोव्हेंबर रोजी त्रिपूरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी शहरात मोठ्या जमावाने मोर्चा काढत दुकानांची तोडफोड केली होती. या घटनेचा निषेध म्हणून १३ नोव्हेंबर रोजी शहरात भाजपच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या दिवशीदेखील एका मोठ्या जमावाने रस्त्यावर उतरुन त्यांनीही हिंसक कारवाया केल्या होत्या.

त्यानंतर अमरावती पोलिसांनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची धरपकड केली होती. त्यामध्ये अनिल बोडेंचाही समावेश होता. अनिल बोडे यांनी हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला होता. त्यामुळे या सर्व गोष्टींचा निषेध देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल पण पदासाठी हात फैलावणार नाही; पंकजा मुंडेंचा निशाणा कोणावर?
मोदी सरकार BSNL आणि MTNL ची करोडोंची संपत्ती विकणार; जाणून घ्या नेमकी किंमत..
ऐकावे ते नवलच! अंघोळ घालताना ‘बाल गोपाळ’च्या मूर्तीचा हात तुटल्यावर पुजाऱ्याने केले हॉस्पिटलमध्ये दाखल…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.