नक्की चाललंय काय? शिवसेना युतीचे संकेत देत असताना देवेंद्र फडणवीस- जयंत पाटलांचा एकाच गाडीत प्रवास

सध्या राज्याच्या राजकारणात नक्की चाललंय काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला भावी सहकारी म्हटले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा युती होणार अशी चर्चा रंगली होती.

त्यानंतर भाजप नेते विरोधी देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांना कदाचित रिअलाईझ झाले असावे की आपण चुकीच्या लोकांसोबत काम करतोय, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनीही युतीचे संकेत दिले होते.

असे असतानाच आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे दिसून आले आहे. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी के आण्णा पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजप पक्षातील नेते एकाच मंचावर आहे. पण या कार्यक्रमाच्या वेळी एका गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील एकाच गाडीतून आले होते.

या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहूणे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खानदेशातील काही नेते उपस्थित राहणार आहे.

स्व. पी के आण्णा पाटील यांनी शहादा तालुक्यात दूध संघ, साखर कारखाना सुतगिरणी, तसेच उच्च शिक्षणासाठी कॉलेज स्थापन करुन या भागाचा संपुर्ण कायापलट केला होता. तसेच आदिवासी बांधवांनासोबत घेऊन स्टार्च फॅक्टरी काढली होती. त्यामाध्यमातून त्यांनी हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

आई ती आईच! समुद्रात दोन मुलांसह अडकली, स्वत:ची लघवी पिऊन मुलांना पाजले दुध अन् शेवटी सोडला जीव
‘मला मुख्यमंत्री करा’ असे म्हणणारे बिचकुले यांनी पुण्यात सुरू केला नवीन व्यवसाय, वाचा…
रात्रीत मालामाल झाला शेतकरी! बॅंक खात्यात अचानक आले ५२ कोटी; जाणून घ्या पुर्ण प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.