सलग ४ वनडेत शतकं ठोकत ‘या’ फलंदाजाने केला वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय संघात निवडीची जोरदार चर्चा

मुंबई | विजय हजारे करंडक स्पर्धेत एका फलंदाजाने मोठा कारनामा केला आहे. यामधील सलग चार एकदिवसीय सामन्यात चार शतक ठोकली आहेत. या फलंदाजाचे नावं देवदत्त पडिक्कल असे आहे. त्याने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत क्रिकेटप्रेमींमध्ये आपली छाप पाडली आहे.

देवदत्त पडिक्कल हा २० वर्षीय युवा फलंदाज आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतो. त्याने विजय हजारे स्पर्धेत गोलंदाजांना चागंलाच चोप दिला आहे. सलामीवीर देवदत्तने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यात चार शतक आणि दोन अर्धशतक लगावली आहेत.

केरळ विरुद्ध कर्नाटक या सामन्यात केरळविरुद्ध धमाकेदार १०१ धावांची खेळी हे त्यांच चौथ शतक ठरले. या शतकासह देवदत्तने श्रीलंकेचा विकेटकीपर बॅट्समन कुमार संगकाराच्या सलग चार वनडे शतकांची बरोबरी केली आहे.

देवदत्तने या मोसमातील सहा सामन्यात ४ शतक आणि २ अर्धशतकांसह ६७३ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. दरम्यान, देवदत्त या युवा खेळाडूला लवकरच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या जागी या खेळाडूची भविष्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
वीरेंद्र सेहवागची तुफान फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर चौकार तर षटकार खेचत अर्धशतक; पहा व्हिडीओ
खोटं खेळून सेहवागचे शतक हुकवणाऱ्या खेळाडूवर आता आलीय ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरण्याची वेळ
“पैशांसाठी आयपीएल स्पर्धेत खेळण्यापेक्षा मी देशासाठी खेळणे पसंत करीन”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.