गेल्यावर्षी धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण; IPL रद्द होणार?

 

क्रिकेटप्रेमींची आतुरता आता लवरकरच संपणार असून ९ एप्रिलपासून आयपीएल सुरु होणार आहे. या पर्वात पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होणार आहे.

हा सामना होण्याआधीच आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण आरसीबी संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिकलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या देवदत्त हा आयसोलेशनमध्ये आहे.

देवदत्त हा बेंगलोरचा सलामवीर बल्लेबाज आहे, पण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला काही दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने देवदत्त खेळणार नसल्याची शक्यता आहे.

देवदत्त कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरसीबीसाठी हा एक मोठा धक्का असू शकतो. कारण देवदत्तने आतापर्यंत आयपीएलच्या अनेक सामन्यात धडाकेबाज प्रदर्शन केले आहे. त्याने गेल्यावर्षी १५ सामन्यात ४७३ धावा केल्या होत्या.

दरम्यान, सर्व संघ २०२१ च्या आयपीएलसाठी तयारीला लागल्यापासून आतापर्यंत तीन खेळाडुंना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होती, तसेच कोलकता नाईट रायडर्सच्या नितिश राणाला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयपीएल पण रद्द होण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.