पराभूत झालो तरी संपलो नाही; पुढच्या वेळी पराभवाचे उट्टे काढील; भगीरथ भालकेंचा निर्धार

पंढरपुर |  राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुर मंगळवेढा विधानसभेत पोटनिवडणूक लागली होती. यामध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपने राष्ट्रवादीवर विजय मिळवला आहे.

भाजपचे समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात  सामना पाहायला मिळाला. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा ३००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द चांगलच रंगलं आहे. आमदार समाधान अवताडे, भाजप नेते प्रशांत परिचारक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

पराभूत झालेले राष्ट्रवादीचे भगीरथ भालके एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, “पराभूत झालो असलो तरी पुढच्या वेळेस पराभवाचे उट्टे काढेन.  भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या विजयानंतर भाजप नेते आमदार प्रशांत परिचारक यांनी भारत नाना यांच्याप्रमाणे शड्डू ढोकला आहे.

“हिंमत असेल तर २०२४ च्या निवडणूकांमध्ये रिंगणात या, त्यावेळी कोण दंड थोपटतय हे दाखून देईल”. असं म्हणतं भगीरथ भालके यांनी प्रशांत परिचारक यांना थेट आव्हान दिले आहे.

दरम्यान  भगीरथ भालके यांच्या पराभवानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का  बसला आहे. भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके  एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा पंढरपुर मंगळवेढा विधानसभेवर निवडून गेले होते.

महत्वाच्या बातम्या-
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चहात मिसळा ‘हे’ दोन पदार्थ; होतील आश्चर्यकारक फायदे
तमिळनाडूमध्ये विजयी झालेल्या स्टॅलीन यांनी राज ठाकरेंना दिले ‘हे’ आश्वासन
भारतनाना माफ करा! तुमच्या सेवेला पैशाने हरविले, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.