Uddhav Thackeray : नाव, चिन्ह जाऊन सुद्धा ‘हा’ हुकूमी एक्का आहे उद्धव ठाकरेंकडं; निवडणूकीतही गाजवणार मैदान

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा केला होता. आपल्याकडे शिवसेनेचे जास्त नेते असल्यामुळे आपणच खरी शिवसेना आहोत असे म्हणत एकनाथ शिंदेंनी चिन्हावर दावा केला होता. पण त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला.

निवडणूक आयोगाने यासंदर्भात पुरावे देण्यास सांगितले होते. पण पुरावे देऊन देखील निवडणूक आयोगाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना या नावावर आणि चिन्हावर काही काळासाठी बंदी घातली आहे. निवडणूकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांसाठी हा मोठा धक्का आहे. पण हा निर्णय अंधेरीच्या पोटनिवडणूकीपूरताच असणार आहे. त्यानंतर पुन्हा यावर एक नवा निर्णय घेतला जाईल. या निवडणूकीत उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे.

अशात लोकांकडून दिलेला पाठिंब्यावरुन निवडणूकीच्या मैदानात जिंकण्याची दोन्ही नेत्यांना संधी असणार आहे. शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रुजलं आहे. पण एकनाथ शिंदे यांनी याच समीकरणाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे ठाकरेच्या अस्तित्वावरंच त्यांनी प्रश्न निर्माण केला आहे.

शिवसेनेने तिकीट दिलेले असले तरी काही प्रतिनिधी असे आहे शिंदे गटात गेले आहे. त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पण ही निवडणूकीची ही लढाई लढण्यासाठीही उद्धव ठाकरेंकडे एक पारंपारिक अस्त्र आहे.

शिवसेनेत आधीही बंड झालेलं आहे. शिवसेनेत सर्वात मोठं बंड छगन भुजबळ यांनी केलं होतं. मंडळ आयोगाच्या मुद्यावरुन त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत मतभेद झाल्याने नारायण राणे आणि राज ठाकरेही बाहेर पडले होते. पण इतके मोठे बंड होऊनही शिवसेनेची ताकद कायम होती.

ठाकरे कुटुंबावर अजूनही जीवापाड प्रेम कऱणाऱ्या शिवसैनिकांची फौज आहे. नेते बाहेर पडले तरी शिवसैनिक ठाकरे कुटुंबाशी निष्ठा राखून आहे. हा इतिहास आहे. हाच उद्धव ठाकरेंचा आशेचा किरण आहे. शिवसैनिकांच्या बळावरच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ही निवडणूक जिंकू शकतात.

एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने केंद्रातील यंत्रणांचा वापर करुन ठाकरे कुटुंबियांचं अस्तित्व मिटवण्याचं प्रयत्न करतंय असे म्हणण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. तसेच त्यांना लाखो सैनिकांचा पाठिंबा मिळू शकतो.

शिवसेना तळागाळात रुजलेली असली तरी कार्यकर्त्यांना ताकद देण्यात उद्धव ठाकरे कमी पडतात, असे म्हटले जाते. जर त्यांना या निवडणूकीत यश मिळवायचे असेल तर त्यांना थेट कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहावं लागणार आहे. तसेच जे आमदार सलग दोन-तीन वेळा निवडणूनही एकनाथ शिंदेंसोबत गेले आहे. त्यांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष संघटनेची उभारणी करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Alka Kubal : अलका कुबल यांच्या पायलट लेकीने पुन्हा घेतली उंच भरारी; मुलीला शुभेच्छा देत अलका म्हणाल्या…
Rape: विद्यार्थिनीने धक्का दिला म्हणून सिनीअर्सने तिच्यावर केला बलात्कार, शाळेने प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न
Neelkanth Bhanu: डोक्याला दुखापत झाल्याने १ वर्ष अंथरूणाला खिळून राहिला, आता उभी केली १० कोटींची कंपनी