परदेशात राहूनही प्रियांका चोप्राने भारतीय संस्कृती जपली, बाळाच्या पायात घातली ‘ही’ गोष्ट

जानेवारी महिन्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आई-वडील झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने(Priyanka Chopra) नुकताच मुलीचा वडिलांसोबतचा म्हणजेच निक जोनाससोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(Despite living abroad, Priyanka Chopra nurtured Indian culture)

फादर्स डे च्या निमित्ताने अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निक जोनास मुलगी मालतीला तिच्या पायावर उभे करताना दिसत आहे. या फोटोमध्ये मालतीने मरून रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच मालतीने स्पोर्ट्स शूज देखील घातलेले फोटोमध्ये दिसत आहेत.

हा फोटो शेअर करत असताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हॅपी फर्स्ट फादर्स डे. तुला आपल्या छोट्या मुलीसोबत पाहण्याचा आनंदच फार वेगळा आहे. किती सुंदर दिवस आहे घरी परत येण्यासाठी. माझे तुझ्यावर प्रेम आहे”, असे अभिनेत्री प्रियांका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मालतीच्या पायात काळ्या रंगाची साखळी दिसत आहे. या साखळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या पायामध्ये काळ्या रंगाची साखळी घातली जाते. त्या साखळीला ‘वाळा’ असेही म्हणतात. ही साखळी अभिनेत्री प्रियांका चोप्राची मुलगी मालतीच्या पायामध्ये घातलेली फोटोमध्ये दिसत आहे.

यावरून अनेकांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे कौतुक केले आहे. परदेशात जाऊनही भारतीय संस्कृती जपल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मुलीचे नाव तिच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आईचे नाव मालती असे आहे.

तसेच प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनास हा ख्रिश्चन आहे. त्यामुळे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवण्यात आले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्राच्या मुलीचा जन्म वेळेपूर्वी झाला होता, त्यामुळे तिला काही काळ रुग्णालयात राहावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या :-
अग्निपथ योजना वाद आणखी चिघळणार? आर्मीने घेतला मोठा निर्णय, आंदोलकांमध्ये संतापाची लाट
PHOTO: ऐश्वर्यापासून ते प्रियांकापर्यंत, ‘या’ अभिनेत्रींनी ब्लाउज न घालताच नेसली होती साडी
तुच रे पठ्या! गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केल्यानंतर तिच्याकडून वसूल केले ७ लाख, ‘असा’ शिकवला धडा