राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अभिनेत्री केतकी चितळेच्याKetaki Chitale) विरोधात इतर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. (Despite getting bail, Ketki Chitale will have to stay in jail for ‘this’ reason)
या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आताच हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री केतकी चितळेला ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामिन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी २५ हजारांचा जातमुचलक्यावर न्यायालयाकडून जामिन मंजूर करण्यात आला आहे. पण अभिनेत्री केतकी चितळेची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेत्री केतकी चितळे विरोधात आणखी एका प्रकरणाची सध्या सुनावणी सुरु आहे. २१ जून रोजी ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला तुरुंगातच सुनावणी होईपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. यादरम्यान केंद्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाकडून पोलीस महासंचालक रजनीस सेठी यांना नोटीस पाठवली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात अटकेच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. मला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगत अभिनेत्री केतकी चितळेने ही याचिका दाखल केली होती. पोलिसांनी माझ्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला आहे, असे अभिनेत्री केतकी चितळेने सांगितले होते.
यानंतर या प्रकरणात केंद्रीय महिला आयोगाने अभिनेत्री केतकी चितळेची बाजू घेत पोलीस महासंचालक रजनीस सेठी यांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.यानंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :-
पेन्शन कपात करायची असेल तर लाखो पगार घेणाऱ्या मंत्र्यांची करा, अग्निपथ विरोधात विद्यार्थ्यांचा संताप
आईचं मंगळसुत्र विकून दंड भरायला आला तरूण, RTO ला समजताच उचललं ‘हे’ पाऊल, होतंय कौतुक
‘पाकिस्तानी टिमचा कोच झाल्यावर सांगेन’, जेव्हा रोहितच्या वक्तव्याने सगळे पोट धरून हसले होते