शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात(Maharashtra) राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. (Despite all this, 18 MLAs are standing firmly behind Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. शिवसेनेच्या निम्म्यापेक्षा जास्त आमदारांनी पक्षाशी बंडखोरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेचे १५ आमदार उपस्थित होते. तसेच शिंदे गटातील ३ आमदार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येतील, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे हे १८ आमदार नक्की कोण आहेत? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर पर्यावरणमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे आहेत. त्यानंतर अजय चौधरी, रमेश कोरगावकर, उदय सामंत, वैभव नाईक, रवींद्र वायकर, उदयसिंह रजपूत, संतोष बांगर आणि भास्कर जाधव हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
याशिवाय सुनील राऊत, राजन साळवी, दिलीप लांडे, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील, सुनील प्रभू, प्रकाश फातर्पेकर आणि संजय पोतनीस हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख शिंदे गट सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आले आहेत.
यासंदर्भात माहिती देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचे आमदार कैलास पाटील सुरतहून पार्ट आले आहेत आणि नितीन देशमुख गुवाहाटीमधून परत आले आहेत. य आमदारांचे अपहरण करण्यात आले होते”, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील २१ आमदारांसोबत आम्ही संपर्कात आहोत, असे देखील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे या बंडखोरीबाबत बोलताना म्हणाले की, “शिवसेना सोडण्याचा आमचा निर्णय नाही. आम्ही दुसऱ्या पक्षासोबतही जाणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“शिंदे साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर आहे”, मराठी अभिनेत्याचे ट्विट चर्चेत
सरकार पाडण्यासाठी आसाम अन् बंडखोर आमदारांना ठेवण्यासाठी गुवाहाटीच का? ‘हा’ नेता होता कारण
शिवसेनेच्या खासदाराने फेटाळून लावले बंडखोरी गटात सामिल झाल्याचे वृत्त, म्हणाला, मी फक्त…