आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; कॉंग्रेसचा सल्ला

मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशातच ठाकरे सरकारकडून लॉकडाउन लावलं जातंय की काय अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतरे असतानाच काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा,’ असा सल्ला चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. आधी या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.

…म्हणून आमचा लॉकडाऊनला विरोध
राष्ट्रवादी पाठोपाठ कॉंग्रेसने ही लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लॉकडाउनवरुन संताप व्यक्त केला आहे. ‘चुकीचं नियोजन आहे. पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

“कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता,” असे निरुपम म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड पुरते अडकले; हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

‘पंढरपुरात फक्त सुरुवात झालीये; जयंत पाटलांच्या एका शब्दाने अख्खी भाजपा कामाला लागलीये’

कोरोनाच्या संकटात घरी बसून केला भन्नाट प्रयोग, आता व्यवसाय सुरु करुन कमवतोय लाखो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.