मध्य प्रदेशातील सतना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सतना शहरातील चौकात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू(Pandit Jawaharlal Nehru) यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची काही जणांनी तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रमुख नेते कमलनाथ यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.(Demolition of the statue of Pandit Nehru video viral)
या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी कमलनाथ यांनी पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे”, असे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते.
https://twitter.com/OfficeOfKNath/status/1529425611651174400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529425611651174400%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fnational%2Fjawaharlal-nehru-statue-vandalized-by-some-people-in-madhya-pradesh-shocking-video-mhkp-707683.html
यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल सिंह परिहार यांनी देखील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेवर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
ही घटना अतिशय निंदनीय आहे, असे मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी सतना शहरातील चौकात असणाऱ्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली. तसेच पुतळ्यावर लाठीमार देखील केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेश पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही तरुण शिवराज चौहान यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तसेच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि काठ्या मारताना दिसत आहेत. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांमधील काही जणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक
ब्रिटीश महाराणीचे ‘या’ भारतीय गुलामासोबत होते संबंध, राजवाड्यात दोघं घालवायचे अनेक रात्री
VIDEO: लॉन्ग गाऊनमुळे दीपिका पदुकोणला येईना चालता, कान्स फेस्टिव्हलमध्ये झाली तारांबळ