अरे बापरे! लॉकडाऊन काळात अचानक वाढली आरामदायी सोफ्यांची मागणी; कारण वाचून हैराण व्हाल

नवी दिल्ली | कोरोनामुळे देशावर मोठं संकट उभं राहिलं आहे. कोरोनामुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. कोरोनामुळे लोकांच्या बाहेर फिरण्यावर निर्बंध आले आहेत. सरकारने कडक नियम लागू केल्याने गेल्या वर्षभरापासून लोकं घरातच आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम म्हणजे घरी बसूनचं काम करण्यास सांगितलं आहे. लोकं गेल्या वर्षभरापासून घरीच असल्याने लोकांनी घरात आरामदायी गोष्टी खरेदी करण्यास भर  दिला आहे.

लोक आरामदायी सोफा, घराची सजावट, स्टोरेज सोल्यूशन यांची मागणी करत आहेत. यामुळे फनिर्चर कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. देशात लॉकडाऊन असला तरी गेल्या काही वर्षांपासून या काळात वस्तूंची विक्री जास्त झाली आहे.

गोदरेज इंटिरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुबोध मेहता म्हणाले की, ग्राहकांनी आपल्या घरांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांना घरात आरामदायी सोफा हवा आहे. गेल्या वर्षी वर्क फॉर्म होम प्रोडक्ट्सच्या विक्रीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती.

सराफ फर्निचरचे मालक रघूनंदन सराफ म्हणाले की, लॉकडाऊनमुळे पुरूष जास्त वेळी घरीच असतात. वस्तू खरेदी करण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होऊ लागली आहे. कोरोना महामारीमध्ये फर्निचरची विक्री ३०० टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी संपुर्ण देशात सरकारने लॉकडाऊन लावला नाही. राज्यातील अनेक शहरांमध्ये फर्निचरची दुकाने चालू आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन सेल सुरू आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्या वस्तू उत्पादित करण्याची क्षमता वाढवत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
महिलेने सर्वांसमोर केली लहान मुलासोबत अश्लील वर्तवणूक; आयपीएस अधिकारी म्हणाला…
रेमडेसिवीर इंजेक्शनला हा तरूण म्हणतोय रेमो डिसूझा इंजेक्शन; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही
‘शोले’ चित्रपटातील रहिम चाचाने तीन वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढले होते कारण…
‘या’ कारणामूळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा होणार होते वेगळे; नात्यात आला होता कडूपणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.