तुमचं तुम्ही बघून घ्या, अमेरीकेचा भारताला ठेंगा; लसीसाठी कच्च्यामालाची मागणी फेटाळली

नवी दिल्ली  | देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे रुग्णांनी जीव गमावले आहेत. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येमुळे लस, बेड, ऑक्सीजन यांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

देशात कोरोनावरील लस बनवण्यासाठी सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली.

केंद्र सरकारकडून अमेरिकेकडे लसींचा कच्चा माल देण्याची विनंती केली होती. मात्र भारताची मागणी अमेरिकेने फेटाळली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसण्याची  शक्यता आहे.

कोरोना लसींसाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने म्हटलं की, भारताची गरज आम्ही ओळखतो. आमचे पहिले प्राधान्य अमेरिकन लोकांना आहे. आमचे नागरिक आमची जबाबदारी आहे. आधी अमेरिकन नागरीकांना लस मिळाली पाहिजे.

अदर पुनावालांनी जो बायडेन यांना हात जोडून केली होती विनंती

पुनावाला यांनी  कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. याबाबत ट्विट करत ते म्हणाले, आदरणीय जो बायडेन जर आपण खरंच कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत एकत्र आहोत.

तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. असं अदर पुनावाला म्हणाले होते.

दरम्यान देशात कोरोनाने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४६ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रदिनी राज्याला मिळणार मोफत लसींचं मोठं गिफ्ट; अजित पवारांनी दिले संकेत
तज्ञ म्हणतात, तुम्ही घरात असून पण तुम्हाला होऊ शकतो कोरोना; बचावासाठी घ्या ही काळजी
भाईजानसाठी कायपण! सलमानच्या ‘राधे’च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पीपीई किट घालून रस्त्यावर

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.