खरचं जुन ते सोनं! भांडी घासण्यासाठी चुलीतल्या राखेची मागणी वाढली, ऑनलाईन केली जातेय विक्री

मुंबई | काळानुसार देशातील आणि जगभरातील सर्व गोष्टींमध्ये बदल झाला आहे. पुर्वी लोक सर्व स्वयंपाक चुलीवर करत होते. लाकडं जाळल्याने शिल्लक राहिलेल्या राखेचा वापर भांडी घासण्सासाठी केला जात होता. आता मात्र अनेकांची चूल बंद झाली. याशिवाय भांडी घासण्याची पद्धतही बदलली आहे.

आधुनिक युगातील बदलत्या तंत्रज्ञानात आणि धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टी खूप पाठिमागे राहिल्या आहेत. पुर्वी राखेने किंवा कोळशाने घासलेली भांडी लख्ख चमकत असे. परंतु आता या राखेची जागा बाजारात उपलब्ध असणाऱ्या नवनवीन उत्पादनांनी घेतली आहे.

आजही ग्रामिण भागात अनेक घरांमध्ये चूल पेटवली जाते. त्यांचा सर्व स्वयंपाक चुलीवर होत असल्याचे दिसते. ही राख अनेकदा फेकून दिली जाते. परंतु आजच्या डिजिटल युगात राख फेकून देण्याची गरज नाही. कारण केमिकल युक्त गोष्टींनी भांडी घासण्यापेक्षा नैसर्गिपणे उपलब्ध होणाऱ्या राखेची ऑनलाईन विक्री केली जात आहे.

ऑनलाईन पद्धतीने राख विक्रीसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे. यासाठी आकर्षक पॉकिंगसह उत्पादन इ-कॉमर्स साईटवर डिश वॉशिंग वुड एश नावाने विकली जात आहे. विशेष बाब म्हणजे अलिकडच्या काही दिवसांत राखेची मागणी वाढताना दिसत आहे. अनेक लोकांनी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकल उत्पादनांना नापसंती दर्शवली आहे.

दरम्यान, तमिळनाडूमधील एक कंपनी राखेची विक्री करत आहे. त्यांनी या राखेची किंमत २५० ग्रॅमकरिता ३९९ आणि एक किलो राखेच्या पॅकिंगची किंमत ६४० रुपये ठेवली आहे. भांडी स्वच्छ करण्यासाठी या राखेचा वापर करता येणार आहे.

भांड्यांचा अन्नाचा येणार वास, तेलकटपणा घालवण्यासाठी आणि भांडी चकचकीत काढण्यासाठी पुर्वीप्रमाणे राखेचा उपयोग करता येऊ शकतो. केमिकल्सची शारीरिक ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तीसाठी राखेने घासलेली भांडी सुरक्षित ठरू शकतो.  याशिवाय राखेचा वापर खत म्हणून करता येतो.

महत्वाच्या बातम्या-
वा रे पठ्ठ्या! अण्णा हजारे यांच्या ड्रायव्हरने शेतीत केली कमाल, सगळीकडून होतेय वाह वाह
बदकाने शिकवली माणुसकी! भूकेल्या माशांना दिले स्वत:चे अन्न, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
बापरे! अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.