बॉलिवुडची अभिनेत्री आणि क्रिकेट मधील स्टार खेळाडु विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हीने ११ जानेवारीला मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मुलीला जन्म दिला. अनुष्का गरोदर आसताना ब्रीच कँडी रूग्णालयातील प्रसिध्द डॉक्टर रूस्तम सोनावाला यांच्याकडे उपचार घेत होती. यांनीच तिची डिलीव्हरी केली आहे.
डॉक्टर रूस्तम सोनावाला यांचे वैद्यकीय क्षेत्रात खुप मोठे नाव आहे. यांचे वय तब्बल ९१ वर्ष आहे. भारत सरकारने १९९१ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. १९४८ साली रूस्तम सोनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. सोनावाला यांनी इंट्रा गर्भाशय निरोधक यंत्राचा शोध लावला आहे. लेखिका रश्मी उद्यसिंह यांनी डॉ रूस्तम सोनावाला यांच्या आत्मचरित्रावर लाईफ गिव्हर हे पुस्तक लिहले आहे.
२० डिसेंबर २०१६ रोजी अभिनेत्री करिना कपुरने याच ब्रीच कँडी रूग्णालयात तैमुर ला जन्म दिला होता. आता करीना दुसऱ्यांदा गरोदर आहे. फेब्रूवारी महिन्यात तीची डिलीव्हरी होईल. करीनाची दुसरी डिलीव्हरी सोनावाला हेच करणार आहेत.
विशेष म्हणजे करिना कपुर यांची आई बबिता यांची डिलीव्हरी याच रूस्तम सोनावाला यांनी केली होती. त्याचबरोबर गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलीव्हरी यांनीच केली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टाटा तुम्ही ग्रेट आहात! रतन टाटांच्या ‘या’ व्हायरल फोटोमागचे कारण वाचून तुम्हीही असंच म्हणाल…
भाऊचा नाद नाय! भारतीय ‘चायवाल्या’ने अंतराळात पाठवला समोसा; व्हिडीओ व्हायरल
निवडणूक आयोगाचा दणका! सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द
जाणून घ्या राम अरुण गोविल यांची एकूण संपत्ती; आकडा वाचून बसेल धक्का