हे’ आमिश दाखवत डिलेव्हरी बॉयने ६६ महिलांना जाळ्यात अडकवून केला बलात्कार

पश्चिम बंगाल | देशात महिला अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये अशी एक धक्कादायक घटना घडली आहे जी वाचून तुम्हाला प्रचंड संताप येईल.

पश्चिम बंगालमधील हूगली येथे दोन केक डिलिव्हरी बॉयने फिडबॅकच्या नावाखाली ६६ महिलांना जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हूगलीमधील त्रिकोण पार्कमध्ये राहणारा विशाल शर्मा आणि सुमन मंडल दोघेजण मिळून शहरातील एका मोठ्या केक डिलिव्हरीच्या कंपनीत काम करतात. केक डिलिव्हरी केल्यावर महिलांना गोड बोलून ते व्हिडिओ कॉल करत असे.

व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल करायचे आणि जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करायचे. आतापर्यंत त्यांनी ६६ महिलांवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

चंदननगर भागातील चूचुडा पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी महिलांना आपल्या जाळ्यात ओढायची पध्दत पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, अन्…
फक्त एक प्लेट भेळीपुरीसाठी दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
मुंबईत बड्या राजकारणी, अधिकाऱ्यांना पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल; मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !
हॉटेल आणि ट्रायल रूममधील छुप्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी वापरा या भन्नाट ट्रिक्स

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.