इंटरनेटवर लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. दिल्लीतील एका तरुणाला खूप नुकसान सहन करून ही गोष्ट लक्षात आली आहे. ऑनलाइन ‘कॉल गर्ल्स’ असे सर्च करून एक तरुण अडचणीत सापडला. व्हिडिओ कॉल करून तरुणीने भेटायला बोलावले. त्यानंतर तरुणीने सहकाऱ्यांच्या मदतीने तरुणाला मारहाण केली आणि 3 हजार रुपये काढून घेतले.(delhi young man search call girl on google)
तसेच तरुणाच्या बँक खात्यातील 33 हजार रुपये देखील तरुणीने आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. याप्रकरणी अमन विहार पोलीस ठाण्यात(Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पीडित तरुणाला मोठा धक्का बसला आहे. अमन विहार परिसरात या घटनेची चर्चा होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तरुण पश्चिम विहारमध्ये(West Vihar) आपल्या कुटुंबासोबत राहतो. तो सॅनिटायझरचा व्यवसाय करतो. दुपारी एकच्या सुमारास त्याने इंटरनेटवर ‘कॉल गर्ल्स’ असे सर्च केले. त्यावेळी त्या त्याला एका मुलीचा मोबाईल नंबर मिळाला. त्याने त्या मुलीशी संपर्क साधला. मुलीशी फोनवरून सवांद झाल्यानंतर मुलीने व्हिडिओ कॉलकरून त्याला रोहिणी सेक्टर-22 मध्ये भेटण्यासाठी बोलावले.
दोन वाजण्याच्या सुमारास तरुण तेथे पोहोचला. तरुणीने तेथून प्रेमनगरच्या दिशेने येण्यास सांगितले. तो तरुण त्या ठिकाणी पोहोचला. यानंतर मुलीने पुन्हा त्या तरुणाला पीर बाबाच्या ठिकाणी बोलावले. त्यानुसार तरुण तिथे पोहचला. सुमारे 5 मिनिटांनी तरुणी त्या ठिकाणी आली. त्यानंतर तरुणाच्या दुचाकीवर बसून ती त्याला पॉकेट-13 येथे घेऊन आली.
मुलीने पॉकेट-13 येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये तरुणाला नेले . त्यानंतर तरुणीने कोणालातरी व्हाट्सअप कॉल केला. काही वेळाने तेथे एक मुलगी आणि दोन पुरुष आले. या चौघांनी मिळून त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तरुणाच्या पर्समधील तीन हजार रुपये काढून घेतले. जीव वाचवायचा असेल तर आमच्या खात्यात ५० हजार रुपये ट्रान्सफर कर, अशी धमकी देखील त्यांनी दिली.
मुलीने दिलेल्या धमकीनंतर तरुणाने वडिलांना फोन केला. त्यावेळी त्यांनी आरोपी मुलीच्या खात्यावर 30 हजार रुपये ट्रान्सफर केले. यानंतर चौघांनी धक्के मारत तरुणाला फ्लॅटबाहेर हाकलून दिले. काही वेळाने तरुणाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बाळाचं नाव पंतप्रधान ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात; जाणून घ्या नक्की काय घडलं
चमत्कार! एचआयव्ही पॉझिटीव्ह महिलेने विषाणूवर केली मात, संशोधकांनाही बसेना विश्वास
त्याने १० लाख झाडं लावून उभारलं जंगल, रेल्वेमार्गासाठी नुकसान भरपाईची रक्कम ऐकून अधिकारी चक्रावले