Delhi University : दिल्ली विद्यापीठाच्या राणी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये(Rani Laxmibai College) एक आगळावेगळा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रत्युष वत्सला(Dr. Pratyush Vatsala,) यांनी वर्गखोल्या उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी भिंतींवर शेण लावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले असले तरी, डॉ. वत्सला यांनी हे पाऊल एका संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून उचलले असल्याचे स्पष्ट केले आहे.
संशोधन प्रकल्पाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण
डॉ. वत्सला(Dr. Pratyush Vatsala,) यांच्या मते, “पारंपरिक भारतीय ज्ञानाचा वापर करून थर्मल स्ट्रेस कंट्रोलचा अभ्यास” या संशोधन प्रकल्पांतर्गत हा प्रयोग केला जात आहे. कॉलेजच्या(Delhi University) एका प्राध्यापकाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवला जात असून, याचा डेटा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. हा प्रयोग पोर्टा केबिनमध्ये – म्हणजे तात्पुरत्या वर्गखोलीत – करण्यात येत आहे. डॉ. वत्सला म्हणाल्या, “माती व शेणासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर सुरक्षित असून, अफवा न पसरवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहणं गरजेचं आहे.”
पारंपरिक ज्ञानाचा आधार
भारतीय ग्रामीण भागांमध्ये पूर्वीपासूनच घरं थंड ठेवण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर केला जात आहे. शेणाला नैसर्गिक इन्सुलेटर मानलं जातं आणि त्यामुळे घरातील तापमान नियंत्रित राहते. तसेच, शेण माश्या, डास आणि इतर कीटकांपासूनही संरक्षण करतं. याशिवाय, शेणाचा लेप जमिनीवरील धूळ कमी करतो आणि घर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. पर्यावरणपूरक असल्यामुळे याचा वापर आजही अनेक गावांमध्ये होतो.
संशोधनाकडे पाहण्याची गरज
सध्याच्या काळात, वाढत्या तापमानामुळे शाळा-कॉलेजमध्ये थंडीकरणाच्या नैसर्गिक पर्यायांची गरज भासत आहे. अशा वेळी, पारंपरिक ज्ञानाचा आधार घेत विज्ञानाशी जोडलेला हा प्रयोग नवीन दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून भविष्यात पर्यावरणपूरक शिक्षण पद्धती आणि साधनांचा वापर कसा वाढवता येईल, यावरही प्रकाश पडू शकतो.
delhi-university-female-principal-literally-covered-the-class-with-cow-dung