महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट फसला; सहा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दहशतवाद्यांचा मोठा हल्ला रोखण्यात यश आले आहे. पाकिस्तानच्या संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करताना दिल्ली पोलिसांनी दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांसह एकूण सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. महाराष्ट्रासह देशातील काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती.

स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या सहा दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरवून टाकण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. अटक केलेले सर्व आरोपी देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न करत होते. सध्या अटक करण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपींची चौकशी केली जात आहे.

दहशतवाद्यांच्या अटकेबाबत दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की दहशतवाद्यांच्या निशाण्यावर येणारे सण म्हणजे नवरात्री, दसरा आणि दीपावली होती. या सणांमध्ये ते बॉम्बस्फोट करणार होते.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांना अंडरवर्ल्डमधून पैसे पुरवण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यातून आयईडी जप्त करण्यात आले आहे. या सहा दहशतवाद्यांमध्ये जान मोहम्मद शेख हा दहशतवादी महाराष्ट्रातील रहिवासी आहे.

दिल्ली पोलिसांनी कोटा येथून दहशतवादी समीर, दिल्लीतील दोन आणि उत्तर प्रदेशातून तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ते म्हणाले की, सहापैकी दोन लोकांना मस्कटमार्गे पाकिस्तानात नेण्यात आले, जिथे त्यांना १५ दिवसांसाठी एके -४७ सह स्फोटके आणि इतर शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दोन टीम तयार केल्या होत्या. एकाला दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम मदत करत होता. एका टीमला सीमेपलीकडून भारतात शस्त्रे आणून ते इथे लपवण्याचे काम सोपवण्यात आले होते. तर दुसऱ्या टीमला हवालाद्वारे पैशांची व्यवस्था करण्याचे काम देण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

या माणसामुळे लागला होता गुंड या शब्दाचा शोध, इंग्रजांच्या काळापासून प्रचलित आहे हा शब्द
वाचा इंदिरा गांधीचे पती फिरोज गांधी यांच्याबद्दल, ज्यांना सोशल मिडीयावर मुसलमान बनवण्यात आलं
धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.