दिल्ली | दिल्ली उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या सज्ञान मुलीला कुठेही आणि कोणासोबतही राहायचं व ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. यावेळी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या सिद्धांतांचा पुनरुच्चार केला.
एका कुटूंबाने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती की, आमची २० वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. नंतर या कुटुंबाने मुलीला फसवून दूर केल्याचेही सांगितले. मग यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला.
यादरम्यान न्यायालयाने थेट त्या मुलीचेच म्हणणे ऐकले. ही मुलगी थेट व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणीला हजर होती. यावेळी तिने सांगितले की तिने स्वतःच्या मर्जीने घर सोडले आहे. तसेच मी लग्न केलं आहे असेही तिने सांगितले.
यानंतर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला आणि निवडीच्या स्वातंत्र्याबद्दल पुन्हा एकदा माहिती दिली. तसेच या प्रकरणाचा निकाल काढला. मुलीचा जबाब घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनी आदेश दिला की तिला सुरक्षित आपल्या पतीच्या घरी सोडा.
तसेच कायदा हातात न घेण्याचे निर्देशही मुलीच्या घरच्यांना दिले. नंतर न्यायालयाने संबधीत परिसरातील बीट पोलीस अधिकाऱ्याचा नंबर या जोडप्याला देण्याचा आदेश दिला आणि गरज पडल्यास त्या क्रमांकावर फोन करा असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; पहा काय आहे ही गुड न्युज
बॉस असावा तर असा! कर्मचार्यांना बनवले करोडपती, जाणून घ्या..