आईच्या दोन्ही किडनी खराब झालेल्या, वडिलांचा मृत्यू आधीच झालेला आणि घरात ४ बहिणी आणि २ लहान भाऊ. घराची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर असतांना काळाने तिच्यासोबत घात केला. २० वर्षीय तरुणीचा कारच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला आहे. अत्यंत दुर्देवी अशी ही घटना नवी दिल्लीतील कंझावल रस्त्यावर झाली आहे. कारची धडक स्कुटीला झाल्यानंतर तरुणीच्या देहाला जवळजवळ १२ किमी फरफटत नेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव अंजली असून घराची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर होती. घरात चार बहिणी आणि दोन भाऊ आहेत तर रहायला स्वतःचे असे घरदेखील नाही. अंजली घर सांभाळण्यासाठी एका इव्हेंट कंपनीत कामाला होती.रविवारी झालेल्या या अपघातात अंजलीला कारने सुल्तानपूरपासून ते कंझावल पर्यंत १२ किमी फरफटत नेले. अंजलीचे शरीर नग्नावस्थेत मिळाले आहे.
पोलीसांनी याबाबत पाच आरोपींना अटक केली आहे. दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्ण,मिथुन आणि मनोज असे या आरोपींचे नावं आहेत. आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे टक्कर झाल्यानंतर अंजलीचा देह कारच्या पुढील बाजूस अडकला आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही.
मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेजनुसार त्यांनी अंजलीला १२ किमी फरफटत नेले आहे. अंजली कारच्या पुढच्या बाजूला अडकली होती. १ जानेवारीच्या मध्यरात्री ३.२८ वाजता यू टर्न घेतल्यावर हे सगळे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. यावरून अंजलीला खूप वेळ फरफटत नेल्याचे समोर आले आहे.
आरोपींना लगेच जामीन का मंजुर होत आहे असे नातेवाईकांनी पोलिसांना सवाल केले आहेत. तसेच शरीर नग्नावस्थेत मिळाल्यामुळे हा अपघात आहे असे अंजलीचे कुटुंब मानण्यास नकार देत आहे. आमच्या मुलीसोबत काहीतरी चुकीचे घडले आहे असा त्यांचा दावा आहे.
दिल्ली पोलिसांनी FIR मध्ये IPC ३०४ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ३ डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करणार असून आरोपींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे जेणेकरून त्त्यांच्या शरीरातील दारूचे प्रमाण समोर येईल. आरोपींना जामिन मिळू नये यासाठी दिल्ली पोलिसांचे प्रयत्न करत. दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या आदेशानुसार कसून चौकशी केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडले अन् रचला अपघाताचा बनाव; ‘या’ कारणामुळे सत्य आले समोर
रिषभ पंतचा भीषण अपघात, गंभीर जखमी अवस्थेत दिल्लीला हलवले; डॉक्टर म्हणाले आता तो..
ब्रेकअपच्या दिवशी शीजानने तूनिशाला मारली होती कानाखाली, बुरखा घालण्यासाठी करत होता दबाव, अभिनेत्रीच्या आईने लावले मोठे आरोप