दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. परंतु रॅली दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये झटपट झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या रॅलीत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन केले. यावेळी दिल्ली-हरयाणा सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आंदोलन स्थळीच मृत्यू झाला. हा शेतकरी सोनीपतच्या मादीना गावातील होता.

तसेच, दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध असे असंख्य शेतकरी आंदोलन करत होते.

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड नेमूण दिलेल्या मार्गावरुन न करता लाल किल्ल्याच्या दिशेने त्यांचे ट्रॅक्टर घेतले. तसेच त्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करत तिथल्या खंबावर झेंडा फडकवला आहे. सुरुवातीपासूनच पोलिसांनी उभा केलेले बॅरिकेड्स शेतकरी आंदोलकांनी तोडले आहेत.

शांततामय पद्धतीने ही ट्रॅक्टर परेड करायची होती हा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असे शेतकरी नेते सांगत आहेत. दरम्यान दिवसभरातील घटनाक्रम पहाता या दोन मृत्यूला जबाबदार कोण? हे ठरवणे कठीण आहे.

महत्वाच्या बातम्या-
…तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती; संजय राऊतांनी केले मोठे विधान
“हिंसाचाराचं समर्थन करणारा प्रत्येक भारतीय दहशतवादीच”, दिल्ली हिंसाचारावर कंगना पुन्हा बरळली
दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.