…तर इथेच फाशी घेणार म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत ढसाढसा रडले, पहा व्हिडीओ

नवी दिल्ली | भारतीय किसान संघटनेचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, जो गुन्हेगार नाही, तो आत्मसमर्पण करणार नाही. तसेच यापुढेही ‘शेतकरी आंदोलन सुरूच राहील’. असंही त्यांनी ठणकावले आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच ‘बंदूकीच्या गोळ्या चालल्या तरी गोळ्या खाण्याची तयारी असेल पण आंदोलन स्थळ सोडणार नाही. धमकावून आंदोलन संपवल तर इथेच फाशी घेईल’. तसेच जर काही चूकीचा प्रकार घडल्यास त्यासाठी पोलीस हेच पूर्णपणे जबाबदार असतील असे त्यांनी म्हटले आहे.

लाल किल्ल्यावरील हिंसाचार कोणी केला याची सर्वोच्च न्यायालयाने केली पाहिजे.

राकेश टिकैत म्हणाले की,  आमची फसवणूक झालीय आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिरंग्याचा अपमान चुकीचा आहे. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने केली पाहिजे. तसेच दीप सिंधु यांचा संबंध कोणाशी आहे याचीही चौकशी व्हायला हवी.

पोलीस टिकैत यांना अटक करू शकले नाहीत

दरम्यान, गाझीपूर सीमेवर उच्च पोलिस अधिकारी दाखल झाले होते. याठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यूपी पोलिसांच्यानुसार टिकैत प्रशासनाचं ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना अटक केली जाऊ शकत नाही.

पुढे राकेश टिकैत म्हणाले, आमचे अन्न-पाणी बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत गावातून पाणी येत नाही तोपर्यत आता मीही इथे अन्नपाण्याचा त्याग करतो आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनात पुढे काय घटनाक्रम घडतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. शेतकरी नेत्याच्या या भुमिकेनंतर आंदोलक आणि पोलीस प्रशासन आमने-सामने आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…
शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतप्त माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा राजीनामा; मोदींवर गंभीर आरोप
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.