दिपीकापासून ते अक्षयपर्यंत ‘हे’ कलाकार बळी पडलेत भयंकर लैंगिक शोषणाला; अनुभव वाचून अंगावर काटा येईल

देशात लैंगिक शोषणाचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते श्रीमंतांपासुन गरिबापर्यंत याला सर्वजण बळी पडू शकतात. अनेक बॉलिवुड कलाकार हे गेल्या काही वर्षात आपल्या सोबत झालेल्या लैगिंक शोषणाबद्दल व्यक्त झाले आहेत. दीपिका पादुकोण, कल्की कोचलीन, नीना गुप्ता यांसारखे अनेक सेलिब्रिटी लैंगिक शोषणाला बळी पडले होते त्यातील काही जणांनी आपला अनुभव सांगितला आहे .

अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने देखील एका मुलाखती दरम्यान आपल्या सोबत झालेल्या विनयभंगाचा एक किस्सा सांगितला, वयाच्या १३ व्या वर्षी सोनम कपूर तिच्या एका मित्रासोबत चित्रपट पाहायला गेली होती आणि तिथे असलेल्या व्यक्तीने तिचा विनयभंग केला. याविषयी सोनम म्हणाली, “मी भीतीने थरथर कापू लागली होती. पण तरीसुद्धा मी थिएटरमध्ये बसून तो चित्रपट पूर्ण पाहिला. माझंच काहीतरी चुकलं असेल, म्हणून माझ्यासोबत ती घटना घडली, असे विचार माझ्या मनात सतत येत होते.”

बॉलिवुडची सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने देखील आपल्या सोबत झालेला एक किस्सा एका मुलाखतीत शेअर केला. तिने एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा शेअर केला. तिने सांगितले, जेव्हा ती लहान होती तेव्हा ती तिच्या परिवारासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली. जेऊन झाल्यानंतर ते घरी चालत जात होते.

बहिण आणि वडील पुढे होते ती तिच्या आईसोबत मागे चालत जात होती यावेळी चालताना एका व्यक्तीने दीपिकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तेव्हा दीपिकाने धावत जाऊन भररस्त्यात त्याची कॉलर पकडत कानशिलात लगावली होती.

तसेच अक्षय कुमारने देखील आपल्या सोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा किस्सा सांगितला. या घटनेबद्दल सांगताना तो म्हणाला, “मी सहा वर्षांचा असताना लिफ्टमध्ये एका पुरुषाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. माझ्या वडिलांना मी याबाबत सांगितलं होतं. त्यांनी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. घडलेल्या घटनेबद्दल मी वडिलांना मोकळेपणाने सांगू शकलो, याचं मला समाधान वाटतं.”

अभिनेत्री नीना गुप्ताने देखील तिच्या आत्मचरित्र ” सच कहू तो” मध्ये सांगितले की, एकेकाळी तिने देखील या सर्वांचा सामना केला. डॉक्टर आणि टेलर कडून तिचा विनयभंग झाला होता.

अभिनेत्री कल्की कोचलीनने देखील अशा विनयभंगाचा सामना केला होता. याबाबत जास्त बोलण्यास तिने नकार दिला “ती अशी घटना होती, ज्याच्या कटू आठवणी मी कित्येक वर्षे विसरू शकले नव्हते.” असे कल्की बोलली.

 

महत्वाच्या बातम्या
बायजूस पाठोपाठ कॅडबरीनेही सुरू केल्या शाहरूखच्या जाहीराती; दिवाळीच्या खास जाहीरातीत दिसला शाहरूख; पहा व्हिडीओ
‘पाहिले न मी तुला’फेम तन्वी मुंडळेवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन

हिंदू सणांवर टिका करताना तोंड उघडते पण ईद आणि ख्रिसमसवेळी तुमची चुप्पी असते; रितेश देशमुख ट्रोल
आदित्य चोप्राने बंटी और बबली पार्ट टू मधून बायको राणी मुखर्जीलाच दिला डच्चू; निर्णयाने भडकली राणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.