दिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज? रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना उधान

मुंबई । बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनावर राज करत असतात. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी २०१८ साली विवाह करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

दरम्यान, शनिवारी मुंबईत रणवीर दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला. यामुळे दीपिका आनंदाची बातमी देणार असल्याचा अंदाज त्यांचे चाहते लावत आहेत. दीपिका आणि रणवीरच्या विवाहानंतर त्यांचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीरला पाहून काहींनी म्हटले आहे की, दीपिका गर्भवती आहे.

तर कोणी म्हटले अभिनंदन, छोटा रणवीर येणार. तर काहींनी सांगितले दीपिका गर्भवती आहेच आणि ती रूटीन चेकअपसाठी आली आहे. दरम्यान अनेकांनी ते इतर काही कामासाठी किंवा चेकअपसाठी रुग्णालयात गेले असावेत असेही म्हटले आहे.

दीपिका आणि रणवीरची तुफान लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी चाहत्यांना फारच उत्सुकता आहे. तर ही पहिली वेळ नाही जेव्हा दीपिकाच्या प्रेगन्सी विषयी चर्चा रंगल्या आहेत. याआधीही अनेकदा अशा बातम्या पसरल्या होत्या.

दीपिका सध्या अभिनेता शाहरुख खान सोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती ऍक्शन भूमिका साकारणार आहे. यासाठी तिने चांगली ट्रेनिंग देखील घेतली आहे. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! ओळख ना पाळख, फक्त डोळ्यात डोळे घालून बघितल्यामुळे तरुणाची हत्याराने वार करत हत्या

मनोज बाजपेयीला नीच म्हणणाऱ्या सुनील पालला मनोज बाजपेयीचे सनसनीत उत्तर; म्हणाला, त्याच्या…

दारु विक्रेत्यासोबत घडलेल्या ‘त्या’ प्रसंगाने बदलले पुर्ण आयुष्य; आता करतोय चहा विक्रीचा व्यवसाय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.