..तर दिपालीचा जीव वाचला असता; दिपालीच्या हत्येला चाकणकरांनी धरले नवनीत राणांना जबाबदार

मुंबई | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आता या घटनेप्रकरणी राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी निशाणा साधला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दिपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता असे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे. दिपाली यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

तसेच रुपाली चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या, कदाचित वेळीच आवाज उठवला गेला असता तर एका कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो. चाकणकर यांनी दिपाली यांच्या सुसाइड नोटचा दाखला देत खासदार नवनीत राणा घेरले आहे. तक्रार करून दुर्लक्ष करणाऱ्या राणा यांचा हत्येत अप्रत्यक्ष सहभाग आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत दिपाली यांच्या सुसाइड नोटचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी नवनीत राणा यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे सांगत त्यांच्याकडे तक्रार केली असता स्थानिक खासदार नवनीत राणा यांनी दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. आता रुपाली चाकणकर यांच्या आरोपानंतर पुढे याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चांगले तापणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत स्थानिक खासदार नवनीत राणा काय प्रतिक्रिया देतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकरल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी(RFO) दिपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वन संरक्षक(DFO) विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच दिपाली यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये धक्कादायक माहिती लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
रात्री मला भेटायला बोलवून…; लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे
DFO ला फाशी द्या नाहीतर…, दिपाली चव्हाणच्या आईची संतापजनक मागणी
रश्मी शुक्लांनी भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.