आत्महत्येपूर्वी दीपाली यांचं पतीला पत्र; आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली..

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी पतीला लिहिलेले भावनिक पत्र समोर आले आहे. ‘मी आपल्या बाळाला गमावलं, आपला परिवार अजून पूर्ण नव्हता झाला, आपल्या संसाराला नजर लागली. तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको करुस, नाहीतर ती माझ्यासारखी तुला वेळ देणार नाही,’ असे दीपाली चव्हाणांनी पत्रात लिहिले आहे.

वाचा आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांनी पतीला लिहिलेले पत्र…

प्रिय नवरोबा… लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे.

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेलेय. खरंच भरून गेलेय. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात.

मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर.

जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस, माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्रास, त्यांच त्रास देनं कमी झालं नाही..

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं.. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे.. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर.. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे..

माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे..

आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू.. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे.. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार डीसीएफ शिवकुमार हा आहे.. दिपाली…

महत्त्वाच्या बातम्या 

अधिकाऱ्याच्या बचावासाठी निवेदन घेऊन आलेल्यांवर नवनीत राणा भडकल्या…

अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून करण्यात आली होती हत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

मुंबईतील हा भिकारी आहे देशातील सर्वात श्रीमंत भिकारी, करोडो रुपयांचे आहेत फ्लॅट सोबतच…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.