दीपक केसरकर (Dipak Kesarkar): एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली. यासोबतच त्यांनी भाजपसोबत आपले सरकारही स्थापन केले आहे. मात्र, शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच त्यांच्यातील वादविवाददेखील प्रचंड वाढताना दिसत आहे.
यात शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केलेत. त्यामुळे त्यांना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून काढून टाकण्यात येणार आहे. आता किरण पावसकर शिंदे गटाचे प्रवक्ते होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी अनेक खुलासे केले होते. यात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट केला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, सुशांतसिह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे काम नारायण राणे यांनी केले.
पुढे, आमच्यासारखे लोक जे ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करतात ते यामुळे दुखावले गेले होते, असेही केसरकर म्हणाले. भाजप व शिवसेनेमध्ये पुन्हा युती होऊ शकली असती. परंतु, सुशांतसिंह प्रकरणात नारायण राणे व त्यांच्या मुलाने आदित्य ठाकरेंची बदनामी केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. तसेच शिवसैनिकांमध्येही नाराजी होती. त्यामुळेच पुन्हा युती करण्याची बोलणी पुढे सरकू शकली नाही, असेदेखील केसरकर म्हणाले.
केसरकर यांच्या या आरोपानंतर नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केसरकर यांना प्रवक्तेपदावरून काढून टाकण्यात आले. यापुढे किरण पावसकर शिंदे गटाची बाजू मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेवरही कब्जा; स्वतःला शिवसेना तर बाकीच्यांना उद्धव ठाकरे गट संबोधले
suicide: पत्नीकडून होणाऱ्या छळा विरोधात लढणाऱ्या तरूणाची अखेर पत्नीच्याच छळाला कंटाळून आत्महत्या
Rape Case: हनुमान गडाचे मठापधिपती खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडिता म्हणाली, त्यांनी मला…
Ajit Pawar: राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस! अजितदादांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने ‘हा’ बडा नेता नाराज