शिंदे गटातील आमदार हे ठाकरे गटातील नेत्यांवर टीका करताना दिसत असतात. ते अनेकदा काही आरोप सुद्धा करत असतात. आता शिंंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. ते दिल्लीवरुन हे कबूल सुद्धा करुन आले होते की, मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, पण त्यांनी तसे केले नाही, असा धक्कादायक खुलासा दीपक केसरकर यांनी केला आहे. मुंबईत केसरकरांनी पत्रकारांनी संवाद साधला होता त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि पक्षाच्या चिन्हावर एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावर दीपक केसरकरांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बोतताना ते म्हणाले की, हे प्रकरण सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रिम कोर्टात मांडावं. केवळ सहानुभूतीसाठी हे सुरु आहे.
पत्रकार परिषद घेऊन लोकांची सहानुभूमी मिळवणं गैर आहे. लोकांना खरं काय ते सांगायला हवं. प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आम्ही लोक आहोत. भाजपसोबत युती होती. पण ती युती तोडून दुसऱ्यांसोबत जायला नव्हतं पाहिजे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
मी पंतप्रधानांशी उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणली होती. चुक दुरुस्त करायची संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. दिल्लीला त्यांनी ते कबूल सुद्धा केले होते. पण त्यांनी तसे केले नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
कुटुंबावर जे काही आरोप झाले त्याने ते दुखावले गेले असतील. पण दुखावले गेले म्हणून असं वागणं चुकीचं आहे. ठरलेल्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी केल्या नाहीत. मी स्वत: स्टेटमेंट दिलेलं आहे. आजसुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ असं मी त्यावेळी बोललो होतो, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
थोरातांनी राजीनामा दिल्यानंतर मी त्यांना फोन केला होता, ते म्हणाले की…; अजित पवारांचा मोठा खुलासा
अखेर ठरलं! ‘या’ दिवशी प्रभास आणि क्रिती सेनन करणार साखरपुडा, एंगेजमेंटचे ठिकाण वाचून शॉक व्हाल
एकनाथ शिंदेंना आव्हान देणं आदित्य ठाकरेंना पडणार महागात, वरळीतील आमदारकी आली धोक्यात?