भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू काल विवाहाच्या बोहल्यावर चढला आहे. जया भारद्वाज ही आयुष्यभरासाठी दीपक चाहरची जोडीदार बनली आहे. १ जूनला रात्री दीपक चाहर आणि जया भारद्वाज हे दोघे कुटुंबिय मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाहबध्द झाले आहेत.
आग्रामधील एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये या दोघांनी लग्न केलं आहे. लग्नानंतर दीपक चाहरच्या फॅन्सना सोशल मिडियावरती पोस्टची प्रतिक्षा लागली होती. दीपक चहरने फॅन्सची प्रतिक्षा काही तासांमध्येच संपवून टाकली आहे. लग्नानंतर दीपक चहरने इन्स्टाग्रामवरती पोस्ट शेअर केली आहे.
दीपक चाहर आणि जया भारद्वाजने इन्स्टाग्रामवरती पोस्ट लिहून शेअर केली आहे. या दोघांनीही लग्नानंतर एकामेकांबद्दलच्या भावना इन्स्टाग्रामवरती शेअर केल्या आहेत. दीपक चाहरने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच तू माझ्यासाठी बनली आहेस असं मला वाटलं.
दीपक चाहरने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, आपण प्रत्येक क्षण एकत्र घालवला आहे. मी तुला नेहमी आनंदी ठेवेन असं वचन देतो. ‘ त्याचबरोबर ‘हा आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असून आम्हाला आशिर्वाद द्या,’ असे दीपक चाहरने पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
जया भारद्वाजने देखील दीपक चाहरची पत्नी झाल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. ‘त्यानं माझं हृदय चोरलं म्हणून मी त्याचं नाव चोरलं असं जयानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दीपक चाहरने आयपीएलच्या मागील सिझनमध्ये स्टॅण्डमध्ये जाऊन जया भारद्वाजला प्रपोज केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ च्या लिलावात चहरला १४ कोटी रूपयांना विकत घेतलं, पण दुखापतीमुळे तो मैदानात उतरू शकला नाही. सीएसकेला मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला होता. मागील वर्षी सीएसकेला आयपीएल चॅम्पियन करण्यात दीपक चाहरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मागील वर्षी आयपीएल चॅम्पियन झालेल्या चेन्नईला यंदा प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नाही.
महत्वाच्या बातम्या:-
मुंग्यांनी केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळेच देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली, खाणीत आहे २२ कोटी टन सोने
शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली
सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील