आयूष्यभर भाड्याच्या घरात राहत होत्या प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक; टेलरसोबत केले होते लग्न

बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री दिना पाठक आज या जगात नसल्या तर त्यांचा अभिनय सदैव लोकांच्या मनात घर करुन राहणार आहे. त्यांनी अभिनयाच्या बाबतीत इंडस्ट्रीतील मोठ्या मोठ्य अभिनेत्रींना मागे टाकले आहे. एवढ्या वर्षांनंतरही लोकांना त्यांचा अभिनय लक्षात आहे.

दिना पाठक बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये आज्जी, सासू आणि आईच्या भुमिका निभावल्या होत्या. कोणतीही भुमिका असली तरी दिना अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचे काम करायच्या. याच कारणामूळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय खुप जास्त आवडतो.

चित्रपटांमध्ये दिनाला पाहील्यानंतर लोकांना त्यांच्या खऱ्या आयूष्यातील आज्जीची आठवण यायची. दिना पाठक यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष काम केले. या वर्षांमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट करत लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. आज आम्ही तुम्हाला दिना पाठक यांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल सांगणार आहोत.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या दिना पाठकने कोणत्याही मोठ्या कलाकारासोबत लग्न न करता. एका साध्या टेलरसोबत लग्न केले होते. गेट वे ऑफ इंडियाला बलदेव पाठक यांचे कपड्यांचे दुकान होते.

दिना पाठकने बलदेव पाठकसोबत लग्न केले होते. बलदेव फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी कपडे डिझाईन करायचे. त्यामूळे त्यांना भारतातील पहीले फॅशन डिझाईनर म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसाठी काम केले होते.

दिना पाठकने चित्रपटांसोबतच अनेत सामाजिक काम केले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये १२० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.  दिना पाठकचे फिल्मी करिअर ६० वर्षांपेक्षा अधिकच्या काळाचे होते.

दिना पाठकला दोन मुली होत्या सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक. दोन्ही मुली फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दिना पाठकला चित्रपटांसोबतच नाटकांमध्ये देखील खुप जास्त रुची होती. त्यामूळे त्यांच्या दोन्ही मुली अभिनयात आल्या.

रत्ना पाठक आणि सुप्रिया पाठक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहेत. त्यांनी त्यांच्या आईच्या नावाला पुढे नेले. विशेष गोष्ट दिना पाठक अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होत्या मृत्यूच्या काही वर्ष अगोदरच त्यांनी स्वत:चे घर घेतले होते. २००२ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी दिना पाठक हे जगं सोडून गेल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या  –
संजय दत्तच्या मुलींच्या सवयीला वैतागून सुनील दत्तने सोडले होते घर
एका चुकीमूळे हिरो बनू शकले नाहीत प्रेम चोप्रा; आजही करतात पश्चाताप
शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राविषयी केला मोठा खुलासा; म्हणाली तो…
‘लगान’ चित्रपटातील अभिनेत्रीचे एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब; रातोरात सोडली इंडस्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.