प्रियांका गांधींना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा- काँग्रेस नेत्यांची मागणी

दिल्ली । काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना एक नवीन जबाबदारी देऊन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. पक्षातील अन्य नेत्यांचाही या मागणीला दुजोरा दिला आहे.

प्रियंका गांधी यांच्यावर सध्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. तसेच उत्तर प्रदेशाच्या त्या प्रभारी आहेत. याआधीच्या निवडणूकांमध्ये प्रियंका उत्तर प्रदेशात चांगल्याच सक्रिय असल्याचे पहायला मिळाले होते.

प्रियंका यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला सोडण्यासाठी नुकतीच नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर आता प्रियंका लखनऊ मध्ये राहायला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रियंका यांचीही उत्तर प्रदेशात राहायची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात जम बसवला तर सत्ताधारी योगी सरकारच्या अडचणीत वाढ होईल असे बोलले जात आहे.

आता काँग्रेस पक्षातीलच नेत्यांनी प्रियंका गांधी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी नियुक्त करावे अशी मागणी केली आहे. यामुळे युपीत राजकीय खळबळ माजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी योगी सरकारपुढे त्यांना मोठे आव्हान उभे करावे लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.