पुन्हा महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावण्याचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक वर्ष २०२१ – २२ साठी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहे. सर्व सामान्यांचे लक्ष सध्या या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी त्यांनी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली. अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पेट्रोलवर २.५ रुपयांचा तर डिझेलवर ४ रूपयाचा कृषी सेस लावला जाणार असल्याचं सांगितलं आहे. पण हा सेस फक्त ब्रॅन्डेड कंपन्यांच्या पेट्रोल डिझेलवर लावण्यात येणार आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार नाही. असंही निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील  उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम होणार नसल्याने काळजी करण्याची गरज नसल्याचंही सांगितलं आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या बाबत विरोधीपक्ष काय भुमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अर्थसंकल्पावर संजय राऊतांचा घणाघात

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे,’ असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

तसेच मोदी सरकारकच्या अर्थसंकल्पात गरिब आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी घोषणा झाली पाहिजे. अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आम्ही तिनही राजे एकच; मी मराठा आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करतो
‘गरिबाला आणखी गरीब करु नका, महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्या’
महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय
आईचा मृतदेह दहा वर्षे ठेवला फ्रिजरमध्ये लपवून; कारण वाचुन संताप येईल

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.