अस्मिता महत्वाची का लाचारी ते ठरवा; मनसेचा नांदगावकरांना जोरदार टोला

मुंबई | शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी हिरानंदानी हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना रुग्णाचे बिल कमी होण्याबाबत, रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला होतो. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली होती.

हिरानंदानी आणि नांदगावकर यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसैनिक नांदगावकरांवर निशाणा साधला आहे. ‘अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा’, असा जोरदार टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नांदगावकरांना लगावला आहे.

कोरोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात द्यावा तसेच हिरानंदानी रूग्णालय प्रशासनाने कुटुंबाला दिलेले बिल कमी करावे. यासाठी नांदगावकर यांनी रूग्णालय प्रशासनाशी वाद घातला होता.

या घटनेनंतर एका व्यक्तीने नांदगावकर यांना फोन करून शिवीगाळ करत, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी त्या आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या वर्षी नितीन नांदगावकर हे मनसेत होते, परंतु मनसेतून त्यांनी ऑगस्ट महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा, अशा शब्दात नांदगावकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.