…अन् पदार्पण करणारा ‘तो’ दहावा खेळाडू सलामीला उतरला, तुफानी शतकही झळकवले

आंतराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न पदार्पणाच्या पहिल्या सामन्याच्या रुपाने पुर्ण होते. पण खेळाडूला त्याच्या पदार्पणाचा पहिला सामना कायम आठवणीत राहील असा खेळावा असेही वाटत असते.

क्रिकेटरचे त्याच्या पहिल्या सामन्यात विशेष चमकदार कामगिरी करण्याचेही स्वप्न असते. हे स्वप्न सर्वांचे पुर्ण होईल असे नाही. पण काही वर्षांपुर्वी पदार्पणाच्या सामन्यात थक्क करणारी कामगीरी एका फलंदाज क्रिकेटपटूने केली आहे. विशेष म्हणजे या खेळाडूला कठीण परिस्थितीत संघात खेळण्याची संधी मिळाली आणि या खेळाडूने या संधीचे सोनं केलं आहे. अशा एका खेळाडूचा किस्सा तुम्ही वाचणार आहात.

इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात ११ ते १६ फेब्रुवारी १९४८ मध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडचे पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज अचानक आजारी पडले. त्यामुळे बिली ग्रिफिथ याचा तो पदार्पणाचा सामना ठरला. या सामन्यात बिलीला १० व्या क्रमांकावरुन थेट सलामीला खेळण्याची संधी मिळाली. संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने घेतलेल्या निर्णयानुसार तो सलामीसाठी मैदानात उतरला. संघाने त्याच्याकडून कोणती आपेक्षा ठेवली नव्हती. पण त्याने केलेली खेळीचे आजही क्रिकेट विश्वात कौतुक केले जाते.

बिली ग्रीफिथ याने धडेकाबाज खेळी केली. त्याने एकूण १४० धावांची मोठी धावसंख्या पदार्पणाच्या सामन्यात केली. यानंतर पदार्पणात धमाकेदार शतक लगवणाऱ्या बिली ग्रीफिथ यांनी इंग्लंडसाठी खूप काळ क्रिकेट खेळले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.