लग्नाच्या पहिल्या रात्री शारीरिक संबंधादरम्यान पत्नीचा मृत्यू, समोर आले ‘हे’ कारण..

लग्न झाल्यानंतर सर्वजण सुखी संसाराची वाट बघत असतात. मात्र ते सर्वांच्याच नशिबात नसते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या तरुणीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळलेल्या नाहीत त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्यांचे लग्न झाले होते, लग्नानंतर पहिल्याच रात्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर रुग्णालयात घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला आहे. अचानक तिला अस्वस्थता जाणवू लागली.

महिलेच्या पतीने शेजाऱ्यांना फोन केला आणि रुग्णालयात जाण्यासाठी टॅक्सी आणण्यास सांगितले. आधी एका टॅक्सी ड्रायव्हरने महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यास नकार दिला. दुसरी टॅक्सी बोलवण्यात आली आणि त्या ड्रयव्हरनेही मदत करण्यास नकार दिला.

यामुळे रुग्णवाहिका येण्यास तब्बल एक तास लागला. आणि याच कारणामुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, असा आरोप पतीने केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या महिलेला ब्रोंकाइटिस आहे, या आजारात श्वासनलिकेत सूज येते.

महिलेच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळून आल्या नाहीत. यामुळे काही दुसरी गोष्ट घडली नसावी असे पोलिसांनी सांगितले. शेजाऱ्यांनी देखील असे काही झाले नसल्याचे सांगितले आहे. ही घटना ब्राझीलच्या इबिराइट शहरामध्ये घडली आहे.

ताज्या बातम्या

वाचा इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री झीनत अमानच्या तीन लग्नांची कहाणी

VIDEO: नाद खुळा! काहीच दिवसांमध्ये चहल शिकला भन्नाट डान्स; बायको धनश्रीला पण देतोय डान्समध्ये टक्कर

आश्चर्यच! भगवान विष्णुची सर्वात उंच मुर्ती भारतात नाही, तर ‘या’ मुस्लिम देशात आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.