अवघ्या १४ वर्षांच्या वयातच झाला होता रसना गर्लचा मृत्यु, मृत्युच्या आधीच लागली होती चाहूल

रसनाची टीव्हीवर येणारी जाहीरात तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये एक लहान मुलगी आहे ची खुप क्युट आहे. आय लव्ह यु रसना म्हणत या चिमुकलीने सर्वांचे मन जिंकले होते. तिचे नाव तरूणी सचदेव होते. दुर्दैवाने तरूणी आज आपल्यासोबत नाही.

अगदी वयाच्या १४ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला होता. वाढदिवसाच्या दिवशीच तिच्यावर काळाने घाव घातला आणि ती हे जग सोडून गेली. आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे तिने आगोदरच आपल्या मृत्युची भविष्यवाणी केली होती.

१४ मे २०१२ रोजी तिचा १४ वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नी एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात १६ भारतीय २ डॅनिश रहिवासी प्रवास करत होते. त्यामध्ये तीन चालक होते.

अचानक सकाळी ९.४५ च्या सुमारास या विमानाचा अपघात झाला आणि या विमानाचे चिथडे झाले होते. या अपघातात १५ लोक ठार झाले होते. त्यामध्ये तरूणीचा आणि तिच्या आईचाही समावेश होता. विमानातील सहा प्रवासी सुदैवाने वाचले होते.

नेपाळला जाताना तरूणीने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारली होती. ही आपली शेवटची भेट आहे असेही ती म्हणाली होती. मस्करीमध्ये ती असे म्हणाली होती. पण ती भेट खरोखरच शेवटची असेल असे कोणालाही वाटले नव्हते.

पण तिच्या नशीबात काहीतरी वेगळेच लिहीले होते. तिच्या मित्रांनी सांगितले की तरूणी याआधी अनेकवेळा ट्रीपला गेली होती पण तिने याआधी कधीही अशी मिठी मारली नव्हती किंवा असा निरोप घेतला नव्हता.

पण तिला अचानक नकळत आपल्या मत्युची चाहूल लागली असावी. तरूणीच्या या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. तरूणीने रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाईल, एलजी, कॉफी बाईट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यांसारख्या अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते.

त्या काळात ती सगळ्यात बिझी छोटी मॉडेल होती. वयाच्या ५ व्या वर्षी ती चित्रपटात झळकली होती. ती तिच्या काळातील सगळ्यात जास्त कमाई करणारी बालकलाकार होती. पा चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भुमिका साकारली होती.

महत्वाच्या बातम्या
आपल्या फाटक्या शुजचा फोटो क्रिकेटरने शेअर करताच प्युमा क्रिकेटने त्याला केली ही मदत
आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक
४० दिवसानंतर पण उद्धव ठाकरेंची खुर्ची स्थिर; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी विरली हवेतच
आनंद महिंद्रांनी शेअर केला एका आगाऊ बाळाचा व्हिडिओ; म्हणाले, हे बाळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.