युपीतील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह लटकलेला आढळल्याने खळबळ

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचा मृतदेह अल्लापूरमधील बाघंबरी गड्डी मठाच्या खोलीत लटकलेला आढळला आहे. मृतदेहाजवळ सुसाईड नोटही सापडली आहे. सुरुवातीला पोलिसांकडून आत्महत्या झाल्याचे सांगितले होते. मात्र, नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या एका शिष्याचे नाव आनंद गिरी यांचे नाव घेतले जात आहे.

त्याचबरोबर आयजी केपी सिंह यांचे नाव घेत आनंद गिरी यांनी त्यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली आहे. सुसाईड नोटमध्ये अनेक लोकांची नावे आहेत. मात्र याबाबत अजूनही काही माहिती समोर आली नाही. एक दिवस आधीच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी महंत नरेंद्र गिरी यांचे आशीर्वाद घेतले होते.

त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर केशव मौर्य यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावे, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे.

ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे. यामुळे आता संशय वाढला आहे. यामुळे आता महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचे पोर्टमार्टम करण्यात आले असून त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या अहवालावरुन महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली आहे, की त्यांची हत्या झाली आहे, याचा खुलासा होणार आहे. काही दिवसांपूर्वी महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद यांच्यात या आधी एकदा वाद झाला होता. या वादाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

असे असले तरी आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी यांची माफी मागितली होती. यानंतर हा वाद मिटल्याचे सांगितले जात होते. याची देखील आता चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आपण दोषी सापडलो तर आपल्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी असे आनंद गिरी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.